#MAHARASHTRA POLITICS : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्यावर अजित पवारांची खोचक टिप्पणी, ” सर्वसामान्यांचं सरकार असल्यावर असंच होणार…!”

462 0

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञात ४ लोकांनी हल्ला केला आहे. शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने हल्ला केला. यानंतर त्यांनी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावर अजित पवार यांनी, ” सर्वसामान्यांचं सरकार असल्यावर असंच होणार…!” अशा भाषेत खोचक टीका केली आहे.

हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने देशपांडे यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक भाषेत टीका केली आहे. ते म्हणाले कि, ” सर्वसामान्यांचं सरकार असल्यावर असंच होणार…! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला संबोधित करताना म्हणतात. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि मुख्यमंत्री देखील सर्वसामान्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी हा टोला लगावला आहे.

Share This News
error: Content is protected !!