अश्विनी जगताप यांनी चिंचवडचा गड राखला; 36 हजाराच्या मताधिक्याने विजय !

703 0

चिंचवड : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निकालाकडे… चिंचवड पोट निवडणुकीमध्ये 36 हजारांच्या मताधिक्याने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी गड राखला आहे.

अश्विनी जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी कटू आव्हान उभं केलं होतं. दरम्यान महाविकास आघाडीला निवडणुकीमध्ये कलाटेंच्या बंडखोरीचा चांगलाच फटका बसल्याचं स्पष्ट दिसून येते आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली होती. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide