उद्धव ठाकरे निवडणुकीचे रणशिंग फुंकणार ! दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातच पहिली सभा, ठाकरे गटाकडून सभेची जोरदार तयारी

627 0

नाशिक : शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई, ठाणे वगळता उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहेत. ठिकठिकाणी सभा घेणार असून जिल्ह्यातील आणि विभागातील निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे विविध विभागांमध्ये जाऊन दौरे करत आहेत.

दरम्यान नुकताच संजय राऊत यांनी नाशिकमध्ये दौरा केला आहे. नाशिक मधील एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आमदार तथा नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यातच ही सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून या सभेची जोरदार तयारी केली जात आहे.

26 मार्चला सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार असून नुकतेच शिवसेना ठाकरे गटामध्ये सहभागी झालेले अद्वय हिरे हे या सभेचे नियोजन करत आहेत. नुकतीच या संदर्भामध्ये मालेगाव येथे बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये स्थळ आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. मालेगाव येथील मसगा महाविद्यालय आणि पोलिस कवायत मैदानावर उद्धव ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्राची सभा पार पडणार आहे.

Share This News
error: Content is protected !!