हृदय पिळवटून टाकणारी घटना : घरात वाजत गाजत येणार होती नवरी; पण सिलेंडरचा स्फोट होऊन आई, बहिणींसह पाच जणींचा ओढावला अंत

824 0

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील भिंड या ठिकाणी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. त्या दिवशी लग्नाची धामधूम घरामध्ये सुरू होती. आजच नवरी घरामध्ये पहिलं पाऊल ठेवणार होती. पण त्यापूर्वीच जेवण सुरू असताना घरात अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन आई बहिणींसह पाच जणांचा होरपळुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे जेवण सुरू होतं. यावेळी अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये नवऱ्या मुलाची आई, काकू, वहिनी आणि दोन बहिणींचा होरपळुन मृत्यू झाला आहे. या घटनेने गावामध्ये शोककळा पसरली आहे.

पहिल्या पत्नीला संपवले; त्यानंतर दुसऱ्या पत्नीसाठी वडिलांची दिली एक कोटीची सुपारी; धूर्त चिरंजीव गजाआड

लग्नाची वरात घरातून निघणार होती. 22 फेब्रुवारीला घरात लग्न होते. तर 20 फेब्रुवारीला लग्नाचे विधी सुरू होते. यावेळी घरामध्ये मोठ्या प्रमाणावर नातेवाईक आणि गावातील लोक उपस्थित होते. यावेळी जेवण बनवत असताना स्वयंपाक घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये घरातील पाच महिला मृत्युमुखी पडल्या आहेत. तर बारा जण जखमी झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!