#PUNE : काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर 11,040 मताधिक्याने विजयी; म्हणाले, “या मुळेच हा विजयाचा दिवस पाहता आला…!” वाचा सविस्तर

351 0

पुणे : कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना 11,040 मतांनी धोबीपछाड केले आहे. यावेळी महाविकास आघाडीनेच गुलाल उधळला असून पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना मतदारसंघातील जनतेचे आभार मानले आहेत.

यावेळी कसबा मतदार संघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे विजयी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी मतदार संघातील जनतेचे आभार मानतो. त्यांनी माझ्या पारड्यात मतरुपी आशीर्वाद टाकले त्यांच्या पाठिंबामुळेच मी विजयी झालो. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. शिवाय महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचेही आभार त्यांनी मानले आहेत. शिवसेना राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीचं काम केलं. त्यामुळेच हा विजयाचा दिवस पाहता आला. त्यांचे मनापासून आभार या विजयाचे श्रेय जनता आणि महाविकास आघाडीच आहे. असं यावेळी धंगेकर यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!