#PUNE : अपयशानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, आत्मचिंतन करू

328 0

पुणे : भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना यश आले आहे दरम्यान तीस वर्षानंतर भाजपवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. कसबा मतदारसंघ हातातून निसटल्यानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की मी कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू.

भाजपने मला उमेदवारी दिली होती. आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण मतदारांनी मला स्वीकारले नाही. मला का स्वीकारले नाही याबाबत मी आत्मचिंतन करेल. या निवडणुकीत मी कमी पडलो आहे. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. 2009 पासून हा संमिश्र असलेला मतदार झाला आहे. जी जागा सलग भाजपने जिंकली असली तरी यावेळी तिरंगी लढत झाली आहे. जे हक्काचे मतदान कमी झालं आणि विरोधी पक्षाचे प्रमाण वाढलं त्यामुळे माझा पराभव झाल्याचं हेमंत रासने यांनी कबूल केल आहे.

आमची सत्ता होती म्हणून मंत्री दिसत होते. त्यांचे सर्वच नेते उपस्थित होते. सगळेच पक्ष राजकीय ताकद लावत असतात. मात्र शेवटी प्रचार यंत्रणा राबवली असली तरी लोकांपर्यंत मी पोहोचलो नाही. असेही मत यावेळी हेमंत रासने यांनी व्यक्त केले.

Share This News
error: Content is protected !!