#PUNE : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, ” माझ्याच घरात वाटले पैसे…!”

794 0

पुणे : काल पुण्यात कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. ही पोट निवडणूक होण्याआधी आणि पार पडल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोप होतच आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपन पैसे वाटपाचा आणि मतदात्यांवर दबाव आणण्याचा गंभीर आरोप करून आंदोलन केले होते.. तर आता निवडणूक पार पडल्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला आहे.

यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात पैसे वाटप केले आहे. ज्या घरात पैसे वाटले ते घर माझंच होतं. असा देखील मोठा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पैसे वाटप केले म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा , माझ्यावरच अन्याय का ? हा पक्षपातीपणा कशासाठी ? असा देखील सवाल रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

Share This News
error: Content is protected !!