पहिले तिला संपवले; मग स्वतःला दिली अशी शिक्षा; प्रेयसीने दुसरीकडे लग्न केले म्हणून असा केला घात !

1366 0

सातारा : सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माण तालुक्यातील वांजोळी या गावात राहणाऱ्या एका जोडप्याने भावी आयुष्य एकत्र जगण्याचा निश्चय केला होता. पण मुलीच्या घरच्यांनी तिचा विवाह दुसरीकडे करवून दिला. या विवाहनंतर ती खुश नव्हती. लग्नाच्या दोन महिन्यानंतर माहेरी आल्यावर तिने पुन्हा तिच्या प्रियकराची भेट घेतली पण ती भेट शेवटची ठरली.

तिच्या प्रियकराने तू माझी होऊ शकली का नाहीस… या रागातून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर या प्रेमवीराने गळफास घेऊन स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुसऱ्या दिवशी या दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर घटना उघडकीस आली.

दरम्यान मृत्युमुखी पडलेली स्नेहल आणि दत्तात्रय या दोघांच्या मृत्यूने सातारा जिल्ह्यातील वांजोळी गाव हादरल आहे. या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!