#ELECTIONS : कसब्यात मतदात्यांचा अल्प प्रतिसाद ; कसबा आणि चिंचवडच्या मतदानाची आतापर्यंतची किती आहे टक्केवारी, वाचा सविस्तर

690 0

पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु आहे. दोन्ही प्रमुख पक्षांसाठी हि निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. आज दोन्हीही मतदार संघांमध्ये मिळून 510 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आहे यामध्ये 13 संवेदनशील मतदान केंद्र आहेत तर आज पाच लाख 68 हजार मतदाता आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

दरम्यान कसबा मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यामध्ये लढत होते आहे . तर चिंचवड मतदार संघामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होते आहे. त्यामुळे कोण जिंकणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे. २ मार्चला कोण गुलाल उधळणार हे कळणार आहे. सकाळी 7 ते दुपारी ३ पर्यंत मतदानाची टक्केवारी काय आहे वाचा…

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात

सकाळी 9 पर्यंत – 6.5%

सकाळी 11 पर्यंत – 8.25%

दुपारी 1 पर्यंत – 18.5 %

दुपारी 3 वाजेपर्यंत 30.05%

चिंचवड विधानसभा मतदारसंघात

सकाळी 9 पर्यंत – 3.52%

सकाळी 11 पर्यंत – 10.45%

दुपारी 1 पर्यंत – 20.68%

दुपारी 3 वाजेपर्यंत 30.55% मतदान

Share This News
error: Content is protected !!