#PARBHANI : गावाकडे फिरायला जात असताना आजोबा आणि नातवावर काळाचा घाला! दुचाकीला बसने उडवले

689 0

परभणी : परभणी मधून एक दुर्दैवी घटना समोर येते आहे. परभणीमध्ये आपल्या आजोबांना गावाकडे घेऊन जात असताना दुचाकीला बसने दिलेल्या जोरदार धडकेत आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सुट्ट्या असल्याने श्रीनिवास शिंदे हा नवयुवक आपल्या आजोबांना गावाकडे घेऊन जात होता. दरम्यान गंगाखेड लोहा राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिली. त्यानंतर बस खाली चिरडलं गेल्याने या दोघांचाही मृत्यू झाला.

अपघातानंतर उपचारासाठी या दोघांनाही रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु तोपर्यंत या दोघांचीही प्राणज्योत मालवली होती. या भीषण अपघातामध्ये आजोबा शिवाजी शिंदे आणि नातू श्रीनिवास शिंदे या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!