चिंचवड मतदार संघ पोटनिवडणुक : भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी

575 0

चिंचवड : आज सकाळपासून चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर राडा झाला आहे.

कसबा आणि चिंचवडमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात दोन्हीही मतदारसंघात मोठा पोलीस बंदोबस्त, आतापर्यंत काय झाले ?

दरम्यान मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त मोठा असताना या घटनेनंतर पोलीस सतर्क आहेत. आज दोन्हीही मतदार संघांमध्ये मिळून 510 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आहे यामध्ये 13 संवेदनशील मतदान केंद्र आहेत तर आज 5 लाख 68 हजार मतदाता आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत

Share This News
error: Content is protected !!