कर्नाटक हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद, पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन (व्हिडिओ)

314 0

पुणे- कर्नाटक राज्यात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. पुण्यात हिजाबला विरोध करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ आज, गुरुवारी पुण्यात राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आलं.

कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालणाऱ्या कर्नाटक भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले वाड्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे तसेच राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी कर्नाटकच्या भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महाराष्ट्रात हिजाब आणि बुरखाधारी महिलांचे समर्थन करण्यात येत आहे. मंगळवारी ‘जमियत उलेमा ए हिंद’च्या प्रमुख मौलांनाची बैठक आमदार मौलाना मुफ्ती ईस्माईल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी महिला मेळावा घेण्यात येऊन तेथे हिजाब आणि बुरखाधरी महिला येणार असून हिजाबचे समर्थन करण्यात येणार आहे. भाजप सरकारने जातीयवाद करू नये.शाळा, महाविद्यालयात विद्या दिली जाते.असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केलं.

नेमकं प्रकरण काय आहे ?

मंगळवारी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये हिजाब (हेडस्कार्फ)वरून वाद चिघळला. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत होता. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मुलांचा एक गट हिजाब परिधान केलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करताना दिसत होता. मात्र, सोशल मीडियावर या मुलींच्या बाजूने समर्थनाचा वर्षाव झाला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!