पुण्यात भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने (व्हिडिओ)

211 0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात राजकारण पेटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरविला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने पुण्याच्या भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरु केले. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्यामुळे भाजपा कार्यालय समोर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.

एकीकडे काँग्रेसचे नेते कोरोना आम्ही नाही तर मोदी सरकारने पसरवला असा आरोप करत होते. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते याला विरोध करत होते. त्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ” केंद्र सरकारने गेल्या दोन-तीन वर्षात पेट्रोल डिझेलचे दर वाढवले त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. कोरोना काँग्रेसने पसरवला असा खोटा आरोप केला आहे. मोदी सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी ठरले आहे याचा त्यांना फटका महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच बसेल”

भाजपचे कार्यकर्ते प्रतीक देसरडा म्हणले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात किती चांगले काम केले हे सामान्य जनतेला चांगलेच माहीत आहे”

Share This News

Related Post

Bajirao Khade

Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन

Posted by - April 24, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बंडखोरी केलेले काँग्रेसचे (Congress) माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव…

आखाती देशात यंदा प्रथमच महाराष्ट्राची लोककला; दुबईमध्ये 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय लावणी महोत्सव

Posted by - December 9, 2022 0
पुणे : आखाती देशात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृती व लोककलेची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक…

नवले पूल अपघात प्रकरणी ट्रक चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Posted by - November 22, 2022 0
पुणे : नवले पूल येथे अपघातात फरार झालेल्या चालकाला सिंहगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मनिराम यादव असे अटक करण्यात…

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध; पहा ‘या’ संकेतस्थळावर

Posted by - November 8, 2022 0
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा…

मोठी बातमी! मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

Posted by - April 20, 2023 0
दिल्ली: राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला मोठा दणका बसला असून मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे मराठा समाजाला इसीबीसी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *