#ACCIDENT : पुणे सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, 1 जण किरकोळ जखमी

5568 0

पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण जवळ आज पहाटे पावणेचारच्या सुमारास स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह अन्य दोघांचा मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी आहेत.

शुक्रवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर एक गावच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे पुण्याच्या दिशेने येणाऱ्या भिगवण बस स्थानकापासून काही अंतरावर भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये कार उतारावर पलटी झाली. यामुळे चालक आणि कार मधील आणखी दोघेजण मृत्युमुखी पडले आहेत. तर चंद्रकांत रामकिसन गवळी हे किरकोळ जखमी झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!