#Nawazuddin Siddiqui : “कबाड़ी, दल्ले और बकरे बेचने वाले ही इसको हांकते हुए नरक में लेकर जाएँगे…!” नवाजुद्दीन सिद्दकी विषयी इतका का भडकला त्याचाचं सख्खा भाऊ ?

784 0

मुंबई : ” स्क्रिप्टेड है ये ! कितनो को ख़रीदोगे ? बैंक बैलेंस ख़त्म ना हो जाये – आपका तो अब काम भी चौपट है , और रुकी फ़िल्मो के कारण फ़िल्म इंडस्ट्री का 150 Cr अटका रखा है। सही है – कबाड़ी, दल्ले और बकरे बेचने वाले ही इसको हांकते हुए नरक में लेकर जाएँगे। “अशी वक्तव्यं प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसाठी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने नाही तर त्याच्या सख्ख्या भावाने केली आहे. पत्नी आलिया सिद्दिकीमुळे नवाजुद्दीन आधीच चर्चेत होता. त्यानंतर त्याच्या मोलकरीणीने दुबईतून व्हिडीओ पोस्ट करत त्याच्यावर आरोप केले होते. अर्थात या आरोपांनंतर तिने माघारसुद्धा घेतली. पण आता नवाजुद्दीनचा भाऊ शमस नवाब सिद्दिकी याने त्याच्यावर सडकून टीका केली आहे.

नवाजुद्दीनच्या मोलकरीणीने दुबईहून रडतानाचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये तिने नवाजुद्दीनवर बरेच आरोप केले होते. मात्र लगेचच तिने दुसरा व्हिडीओ पोस्ट करत नवाजुद्दीनवरील सर्व आरोप मागेसुद्धा घेतले होते.

https://twitter.com/ShamaasNS/status/1628350617977769984?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1628350617977769984%7Ctwgr%5E0f107f4bde8f7f7da7d7bf76637b3a40f73fc827%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fentertainment%2Fnawazuddin-siddiqui-slammed-by-his-own-brother-shamas-nawab-siddiqui-on-house-help-matter-au163-877066.html

शमसने नवाजुद्दीनच्या दुबईतल्या घरातील मोलकरीण सपना रॉबिन मसीहचा एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या भावाला आयफोन भेट देताना दिसतेय. “कालपर्यंत नवाजुद्दीनवर आरोप करणारी ही मुलगी आज तिच्या भावोजींना आयफोन भेट देतेय. त्याला भेट म्हणून दोन महिन्यांचा पगार एकत्रच मिळाला आहे वाटलं”, असा टोमणा त्याने लगावला आहे.

पत्नी आणि मोलकरीणीच्या वादावर नवाजुद्दीनने प्रतिक्रिया दिली. “हे पहा, मला या सर्व प्रकरणी काहीच बोलायची इच्छा नाही. पण माझ्या मुलांच्या अभ्यासावर त्याचा वाईट परिणाम होतोय. माझी मुलं दुबईत शिकतायत. माझी इतकीच विनंती आहे की माझ्या मुलांनी शाळेत जावं आणि अभ्यास करावं. मला बाकी काहीच बोलायचं नाहीये”, असं तो म्हणाला.

नवाजुद्दीन सिद्दिकीने 2010 मध्ये अंजना किशोर पांडेशी लग्न केलं. त्यानंतर तिने आलिया असं नाव बदललं. हे नवाजुद्दीनचं दुसरं लग्न आहे. त्याआधी त्याने शिबा नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं. पण या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. बॉलिवूडमध्ये स्टार होण्याआधीपासून नवाजुद्दीन आलियाला ओळखायचा.

Share This News
error: Content is protected !!