#PUNE : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो तरुणांचा सहभाग, ठिकठिकाणी जंगी स्वागत

701 0

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो काढण्यात आला. या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो तरुण या रोड शोमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच ठिकठिकाणी या रोड शोचं स्वागत करण्यात आलं.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाने चांगली आघाडी घेतली असून, भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ घरोघरी प्रचारासह सभा, पदयात्रा, बाईक रॅली अशा विविध मार्गांनी मतदारांशी संपर्क केला जात आहे. हेमंत रासने यांच्या प्राचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकासमोरुन रॅलीची सुरुवात झाली. अंगरशाह ताकिया, डांगे चौक, पालखी चौक, हमाल तालीम, नटरंग मंडप, पिंपरी चौक, नानापेठ, नाना चावडी, लक्ष्मीरोड, सोन्या मारुती, फडके हौद, लाल महाल, रतन टॉकीज, आप्पा बळवंत चौक, पत्र्या मारुती आदी मार्गांवरुन हा रोड शो मार्गस्थ झाला. रॅलीचा समारोप कामगार मैदानात झाला.

या रॅलीला तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो तरुण रॅलीत आपली दुचाकी घेऊन सहभागी झाले होते. तसेच ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं, तर महिलांकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचं औक्षण करण्यात आलं.

Share This News
error: Content is protected !!