#Travel Diary : भारतातील ‘सातपुडा राष्ट्रीय उद्यान’ म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गचं ! वाचा कुठे आहे ? कसे पोहोचायचे आणि संपूर्ण माहिती PHOTO

1171 0

#Travel Diary : जंगल सफारी सध्या ट्रेंडमध्ये आहे. जंगल सफारीसाठी देशात असलेल्या राष्ट्रीय उद्यानात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. काही लोक वाघ पाहण्यासाठी जातात, तर काही लोक पक्षीप्रेमी असतात. ते निसर्गासोबत क्वालिटी टाइम घालवतात. तर, काही लोक ट्रेकिंगला जाणे पसंत करतात.

Satpura National Park and Tiger Reserve, Timings, Info, Entry Fee

याशिवाय वॉकिंग सफारीही हल्ली लोकप्रिय होत आहे. अगदी सोलो ट्रिपसारखी आहे. आपण एकट्याने आणि आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसह वॉकिंग सफारीवर जाऊ शकता. जर तुम्हीही येत्या काही दिवसांत वॉकिंग सफारीवर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सातपुडा नॅशनल पार्कला जाऊ शकता.

Why Satpura National Park is the Most Unique in India. - The Shooting Star

सातपुडा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

सातपुडा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात आहे. हे ५२४ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. याची स्थापना १९८१ साली झाली. सातपुडा राष्ट्रीय उद्यानाची समुद्रसपाटीपासूनची उंची जास्तीत जास्त १३५२ मीटर आहे. सातपुडा राष्ट्रीय उद्यान अत्यंत दुर्गम जंगलात पसरलेले आहे. या उद्यानात उंच शिखरे तसेच सपाट मैदाने आहेत.

Satpura National Park - Alchetron, The Free Social Encyclopedia

सातपुडा राष्ट्रीय उद्यानात कसे पोहोचावे?

सातपुडा राष्ट्रीय उद्यानाच्या सर्वात जवळचे सुंदर शहर पचमढी आहे. तर सर्वात जवळचे रेल्वे स्थानक पिपरिया आहे. पिपरिया हे सातपुडा राष्ट्रीय उद्यानापासून अवघ्या ५५ किमी अंतरावर आहे. रेल्वेने सातपुडा राष्ट्रीय उद्यानात पोहोचायचे असेल तर पिपरिया गाठता येईल. त्याचबरोबर भोपाळमार्गे सातपुडा राष्ट्रीय उद्यानालाही भेट देता येते.

Satpura National Park & Tiger Reserve Madhya Pradesh, India

वॉकिंग सफारी

वाघ पाहायचा असेल तर सातपुडा राष्ट्रीय उद्यान हे उत्तम ठिकाण आहे. मात्र घनदाट जंगलामुळे वाघाचे दर्शन फारच कमी होते. वॉकिंग सफारीच्या माध्यमातून सातपुडा राष्ट्रीय उद्यानात वाघ, चितळ, नीलगाय, चिंकारा, बिबट्या, सांभर, गौर, रानडुक्कर, अस्वल, काळे हरीण, कोल्हे आणि इतर वन्यप्राणी पाहायला मिळतात. धनेश आणि मयूर देखील तुम्ही पाहू शकता.

Satpura National Park: A Detailed Travel Guide

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!