पुणे शहर हादरले : पुणे कंट्रोल रूमला सासू मारहाण करत असल्याचा आला फोन; घरी जाऊन पोलिसांनी जे पाहिलं ते धक्कादायक होतं…

1541 0

पुणे : पुण्यातील कोथरूड मधून पोलीस कंट्रोल रूमला फोन आला. यातील महिलेने सासू मारहाण करीत असल्याची तक्रार केली. त्यानंतर पोलीस घरी पोहोचले असता त्यांनी जे समोर पाहिलं ते सर्व धक्कादायक होतं. पोलिसांनी सर्वप्रथम या महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कोथरूड सारख्या भागामध्ये हुंड्यासाठी एका बावीस वर्षीय विवाहित तरुणीवर शारीरिक, मानसिक अत्याचार करण्यात आले आहेत. हे अत्याचार एवढे भीषण होते की संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. या तरुणीला हुंड्याचे पैसे माहेरून आणण्यासाठी शरीरावर चटके देण्यात आले. तसेच पाण्यामध्ये मिरचीची पूड कालवून तिच्या तोंडात डोळ्यात आणि कानात टाकण्यात आली. तसेच तिच्या अंगावर मिठाचे पाणी टाकण्यात आले.

या महिलेचे लग्न ऑक्टोबर 2021 मध्ये झाले होते. त्यानंतर तिच्या सासरकडच्यांनी हुंड्यासाठी तिच्याकडे तगादा लावला. त्यानंतर तिला शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे सातत्याने अत्याचार सुरू होते. अखेर असह्य झाल्यानंतर तिने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. त्यावेळी तिला तिची सासू मारहाण करीत होती असे समजते. पोलिसांनी या तरुणीला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल केले. ससून रुग्णालयात या विवाहितेने तिच्यावर झालेली आपबीती पोलिसांना सांगितली. त्यानंतर सासरकडच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!