#MARATHI RECIPE : तोच तोच वरण-भात खाऊन कंटाळा आलाय ? मसूर डाळी पासून बनवलेलं हे वरण नक्की ट्राय करा !

674 0

रोज रोज वरण भात खाऊन कंटाळले असाल तर मसूर डाळीपासून बनवलेलं हे वरण नक्की ट्राय करून पहा. सामान्यतः आपण तूरडाळ किंवा मुगाच्या डाळीपासून वरण बनवतो. तर मग काहीतरी वेगळं हवं असेल तर आजच ही रेसिपी ट्राय करा. चला तर मग साहित्य पाहूयात,

साहित्य : मसूर डाळ, तेल, हिरव्य मिरच्या, हिंग, हळद, मीठ, मोहरी, काडीपत्ता आणि आवडीप्रमाणे शिमला मिरची, वांग, टोमॅटो, कांदा.

कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये आपल्याला मसूर डाळ शिजवून घ्यायची आहे. यासाठी मसूर डाळ स्वच्छ धुऊन घ्या. दीड वाटी मसूर डाळीसाठी एक वांग बारीक काप करून घाला. त्यासह टोमॅटो, शिमला मिरची देखील घालू शकता. यामध्ये थोडे तेल घालून कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घ्या.

कुकर थंड झाल्यानंतर हे वरण रवीने चांगले एकजीव करून घ्या. आता एका कढईमध्ये तेलाची फोडणी करा. मोहरी, हिंग आणि हळदीनंतर हिरवी मिरची ,कडीपत्ता, लसूण घालून कांदा लालसर परतून घ्या.

आता मसूर डाळीचे वरण यामध्ये घालून गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. आता चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.

Share This News
error: Content is protected !!