भाजप उमेदवार अश्विनी जगताप पेड न्यूजमुळे संकटात; निवडणूक आयोगाने धाडली नोटीस, पुढे काय होणार ?

590 0

चिंचवड : चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणूक भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आयोगाने लेखी खुलासा मागितला आहे.

दरम्यान या पेड न्यूज प्रकरणी अश्विनी जगताप यांनी तातडीने खुलासा देखील पाठवला असल्याचे समजते. भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांच्याबाबत एक बातमी न्यूज पोर्टल आणि साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीतील मजकूर हा पेड असल्याचे एमसीएमसी समितीच्या निदर्शनास आले होते.

या प्रकरणी समितीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास पत्र पाठवून माहिती दिली होती. त्यानंतर निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी 16 फेब्रुवारीला अश्विनी जगताप यांना नोटीस बजावली होती. या प्रकरणी अश्विनी जगताप यांनी खुलासा पाठवला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!