#URFI : उर्फी जावेदचा फॅशन सेन्स पाहून चहाते म्हणाले; अरे देवा ! फक्त दोऱ्यांवर टिकवला ड्रेस… PHOTO

786 0

मुंबई : उर्फी जावेद ही एक मॉडेल आहे. दिसायला सुंदर आणि कमनीय बांधा असलेली ही मॉडेल तिच्या कामापेक्षा विचित्र फॅशन सेन्समुळेच नेहमी चर्चेत असते. विचित्र फॅशनचे यासाठी की तिने परिधान केलेले कपडे हे कोणीही घालण्याचा विचार देखील करणार नाही…

 

सायकलची चेन, सेफ्टी पिन, न्यूज पेपर, कपड्यांच्या क्लिप, घड्याळ, काचा आणि कशा-कशापासून या मॉडेलने आजपर्यंत कपडे बनवले आहेत. तिचे काही असे फोटो आहेत जे पाहून चहात्यांना बुचकळ्यात पडायला झाल आहे.

नेमके हे कपडे घातले कसे आहेत आणि अंगावर टिकले तरी कसे असाच प्रश्न नेमका उपस्थित होतो.

कारण अगदी बारीक दोऱ्यांनी हे कपडे शरीरावर घातले किंवा बांधले गेले आहेत. असं म्हणायला हरकत नाही. उर्फीच्या या फॅशन सेन्सवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Share This News
error: Content is protected !!