#PUNE : नवले पुलावरून 50 फूट उंचीवरून तरुणीची उडी ! प्रेम प्रकरणातून उचलले टोकाचे पाऊल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने असे वाचले प्राण…

592 0

पुणे : रविवारी पुण्यामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका 24 वर्षाच्या तरुणीने नवले पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे या महिलेला वाचवण्यात यश आल आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या महिलेने नवले पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नवले पुलाची उंची ही पन्नास फुटाची आहे ज्या ठिकाणावरून या महिलेने उडी मारली असल्याचे समजते. उडी मारण्यापूर्वी ही महिला जोरजोरात ओरडत होती.

घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन नवले पुलाखाली वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस अंमलदार मिथुन राठोड ,अमर कोरडे आणि स्थानिक नागरिक राजू जगताप ,सागर बर्दापुरे ,प्रदीप जोरे ,श्रेयस तांबे यांनी जवळच्या हॉटेलमधून एक सतरंजी आणून खाली धरली आणि काही जणांनी पुलावर या महिलेला रोखण्यासाठी म्हणून धाव घेतली होती. परंतु तोपर्यंत या महिलेने पुलावरून थेट खाली उडी मारली. या सतरंजीमध्ये कसेबसे तिला पकडले गेले. यामध्ये या महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु तिचे प्राण वाचले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून या महिलेने असं टोकाचे पाऊल उचललं. अद्याप सविस्तर माहिती मिळाली नाही. परंतु तिचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तिने थेट पुलावरून 50 फूट उंचीवरून खाली उडी मारली असल्याचे समजते. परंतु सतर्क पोलीस आणि नागरिकांमुळे तिथे प्राण वाचवले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!