#PUNE : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

1081 0

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रशेखर बावनकुळे होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री.शाह यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री पंकजा मुंडे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सीआरपीएफचे सहायक कमांडट सुबोध कुमार आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ऑक्सफर्ड विमानतळ येथे स्वागत
पुणे दि. १८-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ऑक्सफर्ड विमानतळ येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुकत् शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आगमन झाले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यांचे स्वागत केले.

Share This News
error: Content is protected !!