#BEAUTY TIPS : कोरियन मुलींसारखी चमकदार स्किन हवी आहे ? सर्वात सोपा उपाय, विटामिन ई कॅप्सूल अशी वापरून पहा !

881 0

आपण बऱ्याच वेळा पाहतो की कोरियन मुलींची स्किन ही नेहमीच चमकदार आणि तुकतुकीत दिसते. पण तुम्हाला माहित आहे का ? यात फार कुठलेही रॉकेट सायन्स नाही. मार्केटमधल्या फक्त अशा तीन गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या वापराने तुम्हाला कोरियन मुलींसाठी चमकदार स्किन मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या अगदी तुमच्या बजेटमध्ये आणि सहज मिळणाऱ्या वस्तू आहेत. चला तर मग पाहूया या वस्तू कोणते आहेत ते…

ई विटामिन कॅप्सूल :

विटामिन ई फायदे, विटामिन ई स्त्रोत, खाद्य पदार्थ और नुकसान - vitamin e ...
इ व्हिटॅमिनच्या कॅप्सूल तुम्हाला अगदी सहज तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअर मध्ये मिळतील.

एलोवेरा जेल : 

एलोवेरा जेल को इन 22 तरीकों से उपयोग कर आप उठा सकती हैं 22 प्रकार के ...
कोणत्याही कंपनीचे एलोवेरा जेल तुम्ही वापरू शकता. तेही तुम्हाला जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल.

गुलाब पाणी :

Beauty Tips | चमकदार त्वचा हवीय? मग, घरच्या घरी बनवा ‘गुलाब पाणी ...
हे देखील तुम्हाला अगदी सहज मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. घरी बनवणार असाल तर एक गुलाब घ्या. एक ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये गुलाब पाकळ्या रात्रभर भिजत ठेवा आणि हे पाणी वापरलं तरीही चालेल .

आता एक करा, दोन मोठे चमचे एलोवेरा जेलमध्ये एक विटामिन कॅप्सूल घाला. छान मिक्स करा आणि रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर गोलाकार संपूर्ण चेहरा ,गळा आणि मानेवर देखील मसाज करा. मसाज करताना एलोवेरा जेल लवकर कोरडे होत नाही, पण चेहऱ्यामध्ये अब्सोर्ब झाल्यानंतर हातावर रोज वॉटर घेऊन अगदी तीन ते चार मिनिटे का होईना चेहऱ्यावर छान मसाज करा. रोज रात्रीचे हे तीन चार मिनिटे तुम्ही स्वतःला द्या, तुमचा चेहरा अगदी आठ दिवसांमध्ये चमकदार, डाग विरहित आणि सुंदर दिसेल.

Share This News
error: Content is protected !!