#THANE : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; आव्हाड यांच्या समर्थकांचा ठाणे मनपा प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघात हल्ला, त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय ?

598 0

ठाणे : आजची मोठी बातमी ,ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघात हल्ला केल्याच्या आरोपाखाली जितेंद्र आव्हाड यांच्यावर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह आणखी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आव्हाड यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून बुधवारी संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास अभिजीत पवार ,हेमंत वाणी आणि विक्रम खामकर या तिघा जणांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केला असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

धक्कादायक म्हणजे ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली आहे. या ऑडिओ क्लिप मधून जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि जावयाला जीवे मारण्याची कथीत धमकी देण्यात आली आहे. यांचीच ही धमकीची क्लिप असल्याचं सांगत आव्हाड समर्थकांनी आहेर यांना मारहाण केली असल्याचे समजत आहे. याप्रकरणी आता आहेर यांनी नौपाडा पोलीस स्थानकात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय ?
आव्हाड माझा विरोधात कधीही काहीही करेल. मला यांनी त्रास दिला तर मी काहीही करेन. मी बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनला लावले आहेत. स्पेनमधील नातशाचा पत्ता शोधायला. त्याचा जावई ठाण्यात नाही आला तर त्याच्या बापावर एक अटॅक केल्यावर तो येईल एका दिवसात. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली आहे. तो असा नाही आला तर त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे. स्पेन एवढं मोठं नाही.

विकास कॉम्प्लेक्सचा पत्ता आहे. त्याच्या आई वडिलांच्या सोबत एक कांड केलं तर तो आई बाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावली आहे. त्याचा गेम करणार. त्याच्या मुलीला रडायला लावणार म्हणजे त्याला कळणार मुलीच दुःख काय असतं, असं या ऑडिओ क्लिपमध्ये एकजण बोलताना दिसत आहे.

मी टोकाची भूमिका घेतली नाही. प्लानिंग केलं आहे. तो साप आहे. सत्तेत आल्यानंतर मला काहीही करेल. त्यांनी माझ्याबद्दल काही बरं वाईट केलं तर मीही प्लान केला आहे. हा मला जीवे मारू शकतो. त्यामुळे मी देखील प्लानिंग करून ठेवले आहे.

त्याला देखील कळले पाहिजे महेश कधीही स्पॉट होऊ शकतो. आपली फॅमिली उद्ध्वस्त होऊ शकते. मुलीला काहीही होऊ शकते. तेव्हा तो आटोक्यात येऊ शकतो. तेव्हा तो शांत होईल. मला ठेचायचा आहे त्याला. माझ्या माणसाला विचारा सुटकेस भरून बाबाजीकडून पैसे येतात. बाबाजी माझ्यासाठी लीगल प्रॉपर्टीचे काम करतो, असा दावाही या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!