राजगडावर रात्रीच्या मुक्कामास बंदी; राजगडाचे पावित्र्य भंग करणाऱ्या पर्यटकांवर होणार दंडात्मक कारवाई

898 0

राजगड : राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पर्यटक मुक्कामी राहत असल्याने तिथेच जेवण बनवले जाते. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा किल्ल्यावरच फेकून दिला जातो आहे. महत्त्वाच्या वास्तूंच्या आडोशास शौचास बसत असल्यामुळे या सर्व बाबींमुळे किल्ल्यावर घाणीचं आणि दुर्गंधीच साम्राज्य वाढत असल्यामुळे, तसेच स्मारकाच्या पावित्र्याला धोका पोहोचल्याने या स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस पर्यटकांना मुक्कामी राहण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आता ओला, उबेरला देखील लागणार प्रवासी वाहतुकीचा पक्का परवाना, अन्यथा…

महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराण वस्तू शास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष नियम 1962 मधील नियम क्रमांक चार नुसार एखाद्या संरक्षित स्मारकाचा कोणताही विशिष्ट भाग हा पुराण वास्तुशास्त्र अधिकारी त्याचे अभिकर्ते त्यांचा हाताखालील इसम आणि कामगार आणि अशा भागात कामावर असलेला कोणताही इतर सरकारी सेवक यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही समाजासाठी कायमचा किंवा एखाद्या विशिष्ट मुदतीसाठी खुला असणार नाही.

त्यामुळे यापुढे जर कोणीही व्यक्तीने उपबंधाचे उल्लंघन केले तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!