महत्त्वाची बातमी : UGC परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान होणार !

443 0

महत्त्वाची बातमी : देशभर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षणासंदर्भातील राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार देशभर विविध ठिकाणी परीक्षा घेतल्या जात असून यासंदर्भातील परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केले आहे.

नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट सहाय्यक प्राध्यापक म्हणून भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांची योग्यता निश्चित करण्यासाठी 21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2023 या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात येईल याची घोषणा यूजीसीने केली आहे. ही परीक्षा 57 विषयांची संगणक आधारित चाचणी असेल, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार यूजीसीने एनटीएला युजीसी एनइटी आयोजित करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

ही चाचणी भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. दरम्यान फेब्रुवारी 21, 22 आणि 23 त्याचबरोबर 24 फेब्रुवारी 2023 या काळामध्ये ही परीक्षा होणार आहे. यूजीसी नेट 2022 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनी एप्लीकेशनवर आपले अद्यायावत माहिती तपासावी यासाठी प्लेस्टोर वरून विद्यापीठ अनुदान आयोगाचे संदेश हे ॲप इन्स्टॉल करावे. व आपली माहिती यामध्ये नमूद करून अद्यावत परीक्षेबाबत माहिती जाणून घ्यावी.

Share This News
error: Content is protected !!