आगीतून फुफाट्यात ! नैराश्यातून तरुणी करायला गेले आत्महत्या ; वाचवण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेतच वॉर्डबॉयने केला बलात्कार

1491 0

बराच वेळा आपण ही म्हण ऐकली असेल की, देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो पण तुम्हाला बऱ्याच वेळा असाही अनुभव आला असेल की एखाद्या संकटात आपण अडकलो की हळूहळू पुढे अनेक संकट गुंतत येतचं राहतात. एक संकट संपत नाही तर दुसऱ्या संकटात आपण अडकलेलो असतो. या तरुणी विषयी नेमकं असंच काहीतरी घडलं. प्रचंड नैराश्यातून तिने आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचल, तिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तीच दैव बलवत्तर म्हणून नातेवाईकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं.

पण त्या रुग्णालयात तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकत नव्हती. त्यामुळे तिला त्रिशूल या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ति ज्या रुग्णालयात उपचार घेत होती. तिथून तिला या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात येणार होतं.

जी रुग्णवाहिका तिला या मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जाणार होती. त्या रुग्णवाहिकेतील एका वॉर्डबॉईन तिच्यावर रुग्णवाहिकेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीने ही गोष्ट डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टरांनीच रुग्णालयात पोलिसांना बोलावून घेतलं आणि त्यानंतर दयालाल नावाच्या या वॊर्डबॉयला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. याप्रकरणी आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी देखील रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून अहवाल मागवला असल्याचे समजत आहे.

Share This News
error: Content is protected !!