#WHATSAAP : स्टेटसमध्ये व्हिडिओ किंवा फोटो ऐवजी ठेवा स्वतःच्या आवाजात व्हॉइस नोट; आजच WHATSAAP अपडेट करा

1243 0

#WHATSAAP : आपल्या ग्राहकांना नेहमी चांगला अनुभव देण्यासाठी व्हाट्सअप मध्ये नवनवीन पिक्चर्स ऍड केले जात असतात आतापर्यंत आपण व्हाट्सअप स्टेटसमध्ये फोटो किंवा व्हिडिओ ठेवत आलो आहोत पण या नवीन पिक्चरच्या मदतीने आपण स्वतःच्या आवाजामध्ये व्हॉइस नोट देखील स्टेटस म्हणून ठेवू शकता. 

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला अगोदर ॲप अपडेट करावं लागणार आहे. जर तुम्ही बीटा व्हर्जन असाल तर ॲप ओपन केल्यानंतर स्टेटसमध्ये जा आता यामध्ये तुम्हाला उजवीकडे कॅमेरा आणि त्याच्यावर पेन्सिलचे चिन्ह दिसेल. तिथे तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर, आयकॉनवर टॅब करावे लागेल.

आता व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा मजकूर जोडण्यासाठी तुम्हाला पेन्सिल चिन्हावर टॅप करावं लागणार आहे. पुढे मजकूर टाईप करण्याची संबंधित विंडो उघडेल जिथे उजव्या बाजूस मायक्रोफोनचे चिन्ह दिसून येईल. या आयकॉनला टॅप करून तसेच होल्ड करा. तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग 30 सेकंदापर्यंत करू शकता आणि त्यानंतर हे व्हॉइस रेकॉर्डिंग तुम्हाला स्टेटसला शेअर करता येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!