#Accident : अपघात ग्रस्त दुचाकी स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरून पळ काढणारा ट्रकचालक गजाआड

4491 0

पिंपरी : अज्ञात ट्रकचालकाने जबर धडक देऊन पृथ्वीराज शेळके (वय वर्षे 22) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर ट्रक चालकाने अपघातग्रस्त तरुणाची कोणतीही मदत केली नाही. तसेच अपघात झाल्या ठिकाणी न थांबता तिथून फरार झाल्याप्रकरणी संबंधित ट्रकचालकाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने ट्र्क चालकाचा मागोवा काढता आला आहे.

बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 च्या दरम्यान एका ठिकाणी येणार आहे असे कळाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ख्वाजामीया मस्तानमिया खान वय (वर्षे 26) यास ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!