Breaking News

#PUNE : टिळक कुटुंबाला भाजपने डावलल्याने शैलेश टिळक यांनी व्यक्त केली नाराजी म्हणाले, “बाकी कोणी उमेदवारी मागायला नको होती…!”

980 0

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. ही पोटनिवडणूक येत्या सहवीस फेब्रुवारी रोजी होणार असून निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर, ही उमेदवारी टिळक कुटुंबातीलच व्यक्तीला मिळावी अशी अपेक्षा मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना होती. परंतु आज भाजपने कसबा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला असून, पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

दरम्यान कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक वाड्यामध्ये शैलेश टिळक यांची भेट घेतली. यानंतर टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळणार नाही असे स्पष्ट संकेत दिसून येत होते.

यावेळी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शैलेश टिळक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ” मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आम्ही पक्षाकडे तिकिटाची मागणी देखील केली होती. पण तिकीट देण्यात आले नाही. का दिले नाही ,माहित नाही…!” अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

नाराजी एकीकडे व्यक्त केली असली तरीही यापुढे पक्ष सोबतच राहणार असे देखील शैलेश टिळक म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ” मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील कामावर अन्याय झाला. आम्ही पक्षासोबतच राहू, काल देवेंद्र फडणवीस यांनी टिळक वाड्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी उमेदवारी देण्याबाबत काही निर्णय झाला नाही दिल्लीतून निर्णय होईल असं सांगितलं होतं.

चला कसब्यात स्वच्छतेची क्रांती घडवूयात – मुक्ता शैलेश टिळक – Punekar News

यावेळी इतरांनी उमेदवारी मागायला नको होती अशी भूमिका देखील यावेळी त्यांनी मांडली आहे ते म्हणाले की, ” यावेळी बाकी कोणी उमेदवारी मागायला नको होती. हि पोट निवडणूक होती. इतर लोकांनी समजून घ्यायला पाहिजे होतं . मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल आहे.

Share This News
error: Content is protected !!