पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाची भाजपची उमेदवारी आज जाहीर झाली असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाली आहे. आतापर्यंत सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले कसाब मतदार संघाचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा आजपर्यंतचा कार्यप्रवास कसा होता याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात …
अधिक वाचा : #BJP : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी हेमंत रसाने यांना जाहीर !
- सन 2002, 2012, 2017 पुणे महापालिकेत नगरसेवक
- सन 2019-20 ते 2021-22 सलग चार वेळा पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद
- अध्यक्ष, सुवर्णयुग सहकारी बँक लिमिटेड
- उत्सव प्रमुख, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
- सरचिटणीस, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
महत्त्वाची विकास कामे
- स्थायी समिती अध्यक्ष असताना महसूली उत्पन्नात विक्रमी वाढ
- पुण्यदशम – शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर एसी बसमधून प्रवास
- मंडईत भुयारी मेट्रो
- समान पाणीपुरवठा – 24 तास, शुद्ध, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा
- भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय
- शहराच्या मध्यवर्ती भागांतील पावसाळी गटारे, सांडपाणी करणाऱ्या जलवाहिन्या तब्बल 45 वर्षांनी बदलून घेतल्या.
- मध्यवर्ती भागांतील रस्त्यांची निर्मिती
- कसबा मतदार संघातील विविध भागांत सिग्नल सिंक्रानाझेशन आणि सीसीटीव्ही यंत्रणा
- नदीकाठ सुधारणा, नदी शुद्धीकरण प्रकल्पांना गती
महत्त्वाचे उपक्रम
- साडेपाच हजारांहून अधिक रक्त बाटल्यांचे दरवर्षी संकलन
- कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान
- कोरोनाचे घरोघरी जाऊन विक्रमी लसीकरण
- कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य
- कोरोना योद्धा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सन्मान