पुणे : येत्या 26 फेब्रुवारी रोजी कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे भाजपचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा जागेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली असून चिंचवडसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजया होतील, हा विश्वास आहे. pic.twitter.com/QW2BUc3waX
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) February 4, 2023
कसबा विधानसभा मतदार संघासाठी माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपन उमेदवारी दिली आहे