पुणे : सेनापती बापट चौक जंक्शन येथे कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
सेनापती बापट चौक जंक्शन येथे वाहतूक नियमन करत असताना दुपारी तीनच्या सुमारास त्यांना चक्कर आल्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी रत्ना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
सुनील मोरे हे चतुशृंगी वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होते आहे.