निवडणूक निकालापूर्वीच पाषाणमध्ये अभिनंदनाची बॅनरबाजी; ” जीत सत्याचीच…! आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन… ” वाचा ही बातमी

637 0

पुणे : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा काही वेळातच निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने विशेष गाजते आहे. तर पुण्यामध्ये निकाल जाहीर होण्याच्या आधी सत्यजित तांबे यांच्या अभिनंदनाचे बबॅनर झळकत असलेले दिसून येत आहेत.

माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यावतीने पाषाण परिसरात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे फलक लावले आहेत. यावर जीत सत्याचीच आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

एकीकडे निकाल येण्यापूर्वीच सत्यजित तांबे यांच्या विजयाचा दावा केला जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या देखील विजयाबाबत दावा समर्थक करत आहेत. पण पुण्यामध्ये मात्र निकालापूर्वी थेट बॅनरबाजी केल्याने हा चर्चेचा विषय ठरतो आहे.

Share This News
error: Content is protected !!