#AKOLA CRIME : लेकीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप; अत्याचार करून देत होता धमकी…

871 0

अकोल : अकोल्यातील एका घटनेने बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या या नराधम बापाला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बालकल्याण अधिकारी यांना ही मुलगी भीक मागताना सापडून आली होती. या मुलीला त्यांनी बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार गायत्री बालिकाश्रमात दाखल केले होते.

या अल्पवयीन मुलीच्या आईने त्यानंतर तिचा ताबा देखील घेतला होता. दरम्यान चार नोव्हेंबर 2019 रोजी या अल्पवयीन मुलीला वेदना होऊ लागल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी तिच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी आरोपी बापाच्या विरुद्ध भादवी कलम 376 ब ,376 ब ,एम ,एफ 506 तसेच पॉक्सो कायद्याचे कलम चार ,पाच, सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या मुलीचा हा सावत्र पिता होता. परंतु आपल्या मुली समान असणाऱ्या या पीडितेवर अत्याचार करून या नराधमान धमकावले देखील होते. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून या नराधम सावत्र बापाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, एक हजार रुपये दंड ठोठावला आहे.

Share This News
error: Content is protected !!