महत्वाची बातमी : विशाखापट्टणम आंध्र प्रदेशची नवी राजधानी होणार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची घोषणा

937 0

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टनम हि आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून ओळखली जाईल हि मोठी माहिती स्पष्ट केली आहे. मंगळवारी दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडीच्या बैठकीत रेड्डी यांनी राज्याच्या नव्या राजधानीची घोषणा केली.

“येथे मी तुम्हाला विशाखापट्टणमला आमंत्रित करू इच्छितो, जे आगामी काळात आमच्या आंध्र प्रदेश राज्याची राजधानी असेल. येत्या काही महिन्यांत मीही विशाखापट्टणमला शिफ्ट होणार आहे. असे यावेळी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी म्हंटले आहे.

Share This News
error: Content is protected !!