धक्कादायक : कोयता गॅंग मधील 7 अल्पवयीन मुलांची बाल निरीक्षण गृहात केली होती रवानगी; भिंतीला शिडी लावून असे झाले फरार

626 0

पुणे : शहरातील कोयता गॅंग मधील सात अल्पवयीन मुलांची रवानगी येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृहामध्ये करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी या अल्पवयीन मुलांनी भिंतीला शिडी लावून पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील बाल निरीक्षणगृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यात पकडलेल्या विधी संघर्षित मुलांना ठेवण्यात आले होते. बालन्यायालय मंडळाच्या आदेशानुसार सौरभ वायदंडे याला निरीक्षणगृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. यातील अल्पवयीन सात मुलांनी भिंतीला शिडी लावून पलायन केले आहे.

मुलांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या सराईत गुन्हेगारा विरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काटे हे करत आहेत

Share This News
error: Content is protected !!