मोठी बातमी : रोझरी स्कूलचे संचालक विनय आ-हाना यांच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर ईडीचा छापा; वाचा सविस्तर प्रकरण…

476 0

पुणे : पुण्यातील रोझरी स्कूलचे संचालक विनय आराना यांच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर ईडीन धाड टाकली आहे. पिंपरी चिंचवड मधील सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मुलचंदानी यांच्या घरावर शुक्रवारी आणि शनिवारी छापे टाकले होते. त्याचबरोबर विनय आ-हाना यांच्या देखील कार्यालयावर आणि बंगल्यावर छापे टाकण्यात आले होते.

सेवा विकास बँक आणि इतर एका खाजगी बँकेकडे बनावट कागदपत्र सादर करून विनय आ-हाना यांनी कोट्यावधींचे कर्ज घेतल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी आ-हाना यांची कसून चौकशी देखील केली असल्याचे समजते.

कर्ज मिळवण्याची पात्रता नसताना तसेच कर्ज परतफेडीची क्षमता न तपासता हे कर्ज वितरित करण्यात आले, त्यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले आहे. सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जाचे 124 बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. दरम्यान 430 कोटी रुपये विविध व्यक्ती आणि संस्थांना वितरित करण्यात आले होते. 2020 मध्ये सहकारसह आयुक्त राजेश जाधवर यांनी या कर्जाविषयीचे ऑडिट केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी अमर मुलचंदानी यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!