#CYBER CRIME : बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले, त्यावर पुण्यातील तरुणीचा फोटो प्रोफाइल पिक्चर म्हणून लावला, विरोध केल्यानंतर फोटो हटवण्यासाठी केली पुन्हा अश्लील मागणी…

1632 0

पुणे : पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. हरियाणातील प्रदीप गुज्जर या व्यक्तीने पुण्यातील एका तरुणीचा फोटो आपल्या फेक इंस्टाग्राम अकाउंटवर प्रोफाइल पिक्चर म्हणून अपलोड केला. त्यानंतर अकाउंटवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ टाकून महिलेची बदनामी देखील केली. याचा जाब विचारल्यानंतर आरोपीने थेट महिलेला फोटो हटवण्यासाठी अश्लील मागणी केली.

या व्यक्तीच्या विरोधात पुण्यातील तरुणीने भोसरी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी प्रदीप गुज्जर याच्या विरुद्ध आयपीसी 354 अ , 354 ड , 509 , 506 आयटीआय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!