जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरण : नवनीत राणा यांना न्यायालयाचा दणका ! कोर्टाकडून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर फरार घोषीत

472 0

मुंबई : जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी खासदार नवनीत राणांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर फरार म्हणून शिवडी कोर्टाकडून घोषित करण्यात आले आहे. तसेच, नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना ठोठावला एक हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नवनीत राणा अमरावतीतील ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यात तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जातीत असल्याचा दावा करून ती निवडणूक लढवली. मात्र, त्यांनी दाखल केलेलं अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये (लिव्हींग सर्टिफिकेट) फेरफार करून मिळवल्याचे आढळून आले.

त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंह, राम सिंह कुंडलेस यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात महिनाभरात दोनदा वॉरंट बजावले होते. त्याविरोधात राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत, या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची विनंती करणारी याचिकाही दाखल केली होती. ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!