Breaking News

#crime : 16 वर्षीय मुलाचे 32 वर्षीय महिलेसोबत होते शारीरिक संबंध; महिलेने अश्लील चित्रपट पाहण्यासाठी दिला होता मोबाईल, मुलाच्या आईने थेट…

3037 0

कल्याण : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिक मधील एका 32 वर्षीय महिलेवर पीडित मुलाच्या आईने गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने अल्पवयीन मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच अश्लील चित्रफित पाहण्यासाठी आणि संपर्कात राहण्यासाठी मोबाईल देखील दिला असल्याचे समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 पासून या महिलेचे अल्पवयीन मुलासोबत शारीरिक संबंध होते. मुलगा सातत्याने शाळेला सुट्टी घेत होता. तसेच नाशिकला ये जा करत होता. नाशिकमध्ये या मुलाच्या आत्याच्या घराशेजारी ही महिला राहते. मुलाच्या आईने मुलाकडे बऱ्याच वेळा त्याच्या विचित्र वागण्याचे कारण विचारले, पण मुलगा काहीच बोलत नव्हता. म्हणून मुलाच्या आईने खाजगी शिकवणीच्या शिक्षकाला मुलाकडे चौकशी करण्याची विनंती केली.

त्यावेळी मुलाने शिक्षकांकडे या गोष्टीची कबुली दिली. त्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी त्यास मानसोपचार तज्ञास देखील दाखवले. परंतु त्यात कोणताही फरक पडला नाही. तो सातत्याने या महिलेच्या संपर्कात राहतच होता. तसेच त्याला अश्लील चित्रफित पाहण्याचे देखील व्यसन जडले होते. त्यामुळे पीडित मुलाच्या आईने या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार कोळसेवाडी पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!