Breaking News

#PAKISTAN : पेशावरमध्ये नमाज सुरू असताना हल्लेखोराने बॉम्बने स्वतःला उडवलं ; 28 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी

776 0

पाकिस्तान (पेशावर) : पेशावरमधून एक धक्कादायक वृत्त समोर येते आहे. येथील एका मशिदीमध्ये नमाज पठण सुरू असताना एका हल्लेखोराने बॉम्ब स्वतःला उडवून दिला आहे. या बॉम्बस्फोटामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला असून दीडशे जण जखमी झाले आहेत. तर मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

दरम्यान पाकिस्तानमधील पेशावरमध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. यात मोठ नुकसान देखील झालं असल्याच समजतंय. बॉम्बस्फोट झाल्यानंतर मशिदीचे छत कोसळलं, त्यामुळे ढिगार्‍याखाली अनेक जण अडकले असण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे.

पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी मदत कार्य सुरू केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार मृतांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

Share This News
error: Content is protected !!