नाशिक : आज नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघासाठी २९ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते आहे. दरम्यान वातावरणातील गारवा पाहता मोठ्या प्रमाणावर दाट धुके पडले असल्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदानाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे.
नाशिकमध्ये आज सकाळपासूनच वातावरणामध्ये दाट धुके पडले आहे. पदवीधर मतदार संघाची निवडणूक आज पार पडत असून या दाट धुक्याचा मतदानावर परिणाम दिसून येतो आहे.