#Crime News : कोल्हापुरातील जयंती नाल्यात आढळला महिलेचा मृतदेह; हत्या की घातपात, तपास सुरू …

1561 0

कोल्हापूर : कोल्हापुरात आज एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे . कोल्हापुरातील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापुरातील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ शनिवारी दुपारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार या महिलेचे वय 35 ते 40 वर्षे असावे या महिलेने आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे ही गोष्ट उत्तरीय तपासणी नंतरच स्पष्ट होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे. तथापि अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी ही महिला मयत झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अधिक तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!