Breaking News

शाहरुख खान थुंकला की फुंकर मारली ? ट्रोलर्सकडून नवा वाद

248 0

मुंबई- ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं काल निधन झालं. मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याने लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओवरून सध्या ट्रोलर्सनी शाहरुखवर टीका सुरु केली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यावेळी शाहरुख खान याने श्रद्धांजली अर्पण करताना दोन्ही हात जोडून दुआ केली आणि त्यानंतर मास्क खाली करून फुंकर मारत असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. शाहरुख थुंकला असल्याचा आरोपही काही लोकांनी केला आहे.

शाहरुख खानच्या या व्हिडिओवरून सोशल मिडियावर वाद सुरू झाला आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र ही प्रक्रिया म्हणजे थुंकनं नसून, दुआ केल्यानंतर मारलेली फुंकर असल्याचं समजतंय. इस्लाम धर्मात दुआ करताना अशा पद्धतीने फुंकर मारली जात असल्याचं इस्लाम धर्मातील तज्ञ सांगतात. इस्लामची माहिती असणाऱ्या अनेकांनी शाहरुख थुंकल्याचा हा दावा खोडून काढत शाहरुखने मास्क खाली घेऊन पार्थिवाकडे पाहून फुंकर मारल्याचं म्हटलं. एखाद्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना त्याच्या पार्थिवावर फुंकर मारल्यास पार्थिवासोबतच्या नकारात्मक शक्ती दूर लोटल्या जातात असा समज आहे. त्यामुळेच इस्लाम रिवाजानुसार मृत व्यक्तीच्या पार्थिवावर फुंकर मारली जाते.

Share This News
error: Content is protected !!