अनंत अंबानीचे पुन्हा एवढे वजन कसे वाढले ? स्वतः आई नीता अंबानी यांनी सांगितले ‘हे’ कारण !

1934 0

मुंबई : सध्या अनंत अंबानी यांच्या साखरपुड्यातील फोटोंमुळे ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. पण यावेळी ते त्यांच्या अति स्थूलपणामुळे अधिक चर्चेत आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर त्यांना ट्रोल देखील केले जाते आहे.

2016 मध्ये 108 किलो वजन घटवल्यानंतर अनंत अंबानी हे अनेकांचे आदर्श बनले होते. पण पुन्हा एकदा त्यांच्या वजनामध्ये मोठी वाढ झालेली नुकत्याच त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोमधून दिसून येते आहे. याविषयी स्वतः नीता अंबानी यांनी सांगितले होते की, अनंत अंबानी यांना अस्थमा आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर स्टेरॉइड्स घ्यावे लागतात. तसेच स्टेरॉइड्समुळे त्यांना अधिक भूक लागते. यामुळेच वजन वाढण्याचा मोठा धोका निर्माण होतो आहे. तसेच स्टेरॉइड्सयुक्त औषधांमुळे शरीरात पाणी देखील साठते आणि शरीर सुजण्याचा धोका देखील कायम राहतो.

2016 मध्ये जेव्हा अनंत अंबानी यांनी वजन कमी केले होते, तेव्हा त्यांनी झिरो शुगर हाय प्रोटीन आणि कमी फॅट वाले डाएट फॉलो केलं होतं. तसेच दररोज 1200 ते 1400 कॅलरीचे सेवन केले होते. यासह ताज्या हिरव्या भाज्या, डाळी, मोड आलेली कडधान्य तसेच दूध, पनीर या आहाराचे ते सेवन करत होते. यामुळे त्यांचे वजन कमी झाले होते. परंतु अस्थमामुळे अटॅक आलेल्या रुग्णांना डॉक्टर स्टेरॉइड्स देत असतात. त्यामुळे श्वासनलिकेत आलेली सूज कमी होण्यास मदत होते. या स्टेरॉईड्समुळेच अनंत अंबानी यांचे वजन पुन्हा एकदा वाढले आहे.

Share This News
error: Content is protected !!