#PUNE : पुणेकरांनो वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहेत ना ? अन्यथा होऊ शकतो एक हजार रुपयांचा दंड, वाचा ही बातमी

824 0

पुणे : पुण्यात सध्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसतील तर आरटीओकडून गाड्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येतो आहे. केंद्र शासनाने नव्या वर्षातील एक जानेवारीपासून देशातील सर्व वाहनांना नव्या नियमानुसार एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक केली आहे.

गेल्या दोन दिवसात पुणे आरटीओ ने 127 वाहनांवर कारवाई केली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने नव्या खरेदी होणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची केली आहे. तर आता जुन्या वाहनांना देखील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या वाहनांना या नंबर प्लेट नसतील अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येते आहे.

Share This News
error: Content is protected !!