#FRAUD : बंगला खरेदी करण्याच्या बहाण्याने बनावट कागदपत्र बनवून बँकेतून घेतले 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज, मालकाच्या लक्षात आल्यावर …

921 0

पुणे : बंगला खरेदी करण्याच्या पाहण्याने बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज मंजूर करून घेऊन फसवणूक करणाऱ्या चौघांवर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश भारवाणी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

अधिक वाचा : VIDEO: कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार 

मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथे प्रकाश भारवाणी यांचा बंगला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी मिलिंद भुसारी यांनी तो बंगला विकत घेण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून बंगल्याच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेतल्या. त्यानंतर बनावट कागदपत्र तयार करून बँकेतून 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज मंजूर करून घेतले. याबाबत फसवणूक झाली असल्याचे भारवाणी यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!