Top News Marathi Logo

#PUNE : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट उमेदवार देणार ? संजय राऊत यांनी सांगितले, कसबासाठी….

609 0

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केल्यानंतर आता राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. दोन्हीही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणूक होते आहे. या जागांसाठी आता ठाकरे गट उमेदवार देणार का ? या विषयी प्रश्न केला असता, खासदार संजय राऊत म्हणाले की, “पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. पण कसबा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबाबत बातचीत करून निर्णय घेतला जाईल. “

त्यामुळे आता पिंपरी चिंचवडसाठी शिवसेना कोणाला उमेदवारी देते आणि कसबा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीचा उमेदवार असणार की काँग्रेसचा हे लवकरच समजेल.

Share This News
error: Content is protected !!